विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी
By Admin | Updated: May 17, 2015 01:23 IST2015-05-17T01:23:18+5:302015-05-17T01:23:18+5:30
दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड

विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी
कऱ्हाड : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गणेश दत्तोबा शेळके याला दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. रेणुका सातव यांनी सुनावली. गणेश शेळके याने २२ जून २०१० रोजी त्याच्या परिचित असलेल्या महिलेला इच्छितस्थळी सोडतो, असे सांगून स्वत:च्या गाडीत बसून अन्य ठिकाणी नेऊन तिचा विनयभंग केला होता. याबाबतची तक्रार संबंधित महिलेले कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. हवालदार धनंजय कोळी यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात गणेश शेळकेच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. रेणुका सातव यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालविण्यात आले. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य मानून गणेश शेळके याला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. नितीन नरवाडकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी हिरालाल पवार यांनी मदत केली. (प्रतिनिधी)