मोळाचा ओढा परिसरातील गटरकामाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST2021-04-22T04:40:55+5:302021-04-22T04:40:55+5:30
सातारा : सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मोळाचा ओढा परिसरातील गटरकामाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मोलाचा ओढा ...

मोळाचा ओढा परिसरातील गटरकामाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी
सातारा : सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मोळाचा ओढा परिसरातील गटरकामाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मोलाचा ओढा या भागात अनेक प्रकारचे व्यावसायिक, रहिवासी वास्तव्याला असल्याने येथील नागरिकांची गटरव्यवस्था नसल्याने खूप गैरसोय होत होती. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या विनंतीनुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हसवे ते सारखळ हा ५ कोटींचा रस्ता मंजूर करताना मोळाचा ओढा ते बुधवार नाका या रस्त्यावर ६०० मीटर अंतराचे काँक्रीटचे गटर, त्यावर स्लॅब व पेव्हर ब्लाॅक टाकून फुटपाथ म्हणून वापरता येईल असे मंजूर केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला गटरकामाचा प्रश्न लक्ष घालून सोडविल्याबद्दल आघाडीचे भारत भोसलेंसह ग्रा. पं. सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, नीलम देशमुख, माधवी शेटे, पिंटू कडव, माजी उपसरपंच विकास देशमुख, सतीश सूर्यवंशी, विजय गार्डे, नितीन तरडे, राजेंद्र केंडे, रमेश इंदलकर, गुरुमितसिंग रामगडिया, मनोज कडव, तुषार जोशी, सर्जेराव कडव, हणमंतराव पालेकर, सुरेश शेटे, शेखर इंगवले, संजय इंगवले, बबन चिकणे, वसंत शिंदे, ॲड. संजय दुदुस्कर, किरण भोसले, तसेच सर्व व्यापारी बांधव व नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
---फोटो आहे