सदर बझारमध्ये लहान मुलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST2021-01-23T04:39:20+5:302021-01-23T04:39:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील सदर बझार परिसरात सात ते आठ मोकाट कुत्र्यांच्या कळपाने एका लहान मुलीवर हल्ला ...

सदर बझारमध्ये लहान मुलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला;
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील सदर बझार परिसरात सात ते आठ मोकाट कुत्र्यांच्या कळपाने एका लहान मुलीवर हल्ला केला. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सदर बझार परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर व चौकाचौकांत ठिकठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी दिसत आहेत. अनेक वेळा लहान मुलांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कल्याणी शाळेसमोर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता; तर नुकतेच डबेवाडी आणि जकातवाडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांवर हल्ला केला. त्यात डबेवाडी येथील २२ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. कुत्र्यांनी मुलीचे भरदिवसा शरीराचे लचके तोडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशाच प्रकारचे हल्ले सदर बझारमध्ये होऊ लागल्याने कल्याणी शाळेसमोरील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सातारा नगरपालिका प्रशासनाने या प्रकरणात वेळेत लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.