मोहन राजमानेंना काँग्रेसकडून उमेदवारी
By Admin | Updated: May 30, 2014 00:49 IST2014-05-30T00:49:22+5:302014-05-30T00:49:40+5:30
पुणे विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ : २० जूनला होणार मतदान

मोहन राजमानेंना काँग्रेसकडून उमेदवारी
कºहाड : पुणे विधानपरिषद शिक्षक मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने कºहाड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत ही घोषणा केली. दि. २० जून रोजी होणार्या या निवडणुकीकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपप्रणित विद्यमान आमदार भगवानराव साळुंखे यांनी एक वर्षभरापूर्वीच ‘मै हंू ना..!’ म्हणत पुन्हा आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानेही त्यांची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कोण? या बाबतची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. डॉ. राजमानेंच्या उमेदवारी घोषणेने आता राजकीय वातावरण खर्या अर्थाने तापले आहे. पुरोगामी विद्यार्थी युवक संघटनेत सुरुवातीपासूनच डॉ. राजमाने सक्रिय होते. प्राध्यापक म्हणून २० वर्षे शिक्षक संघटनेत त्यांनी काम केले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जुलै २००८ मध्ये झालेल्या पुणे विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राजमाने यांनी लढविली होती. यात दुसर्या क्रमांकावर राहिले होते. यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांना शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने ही यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी विधानपरिषद निवडणुका एकत्रित लढवित आहेत. त्यानुसार पदवीधरचा उमेदवार राष्ट्रवादीचा तर शिक्षक उमेदवार काँग्रेसचा असा निर्णय झाला. त्यानुसार डॉ. मोहन राजमाने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. (प्रतिनिधी)