तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी मोहन कोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:13 IST2021-02-18T05:13:18+5:302021-02-18T05:13:18+5:30
नागठाणे : सातारा तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी मोहन कोळी तर सचिव पदी संजय यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी मोहन कोळी
नागठाणे : सातारा तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी मोहन कोळी तर सचिव पदी संजय यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ तालुका शाखा साताराची २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड सभा राज्य मानद सचिव व अभिजित चव्हाण तालुकाध्यक्ष कोरेगाव यांचे निरीक्षणाखाली जिल्हाध्यक्ष दीपक दवंडे, सचिव नंदकुमार फडतरे, शरद गायकवाड, गोविंदराव माने आणि माजी अध्यक्ष रामचंद्र गोडसे यांच्या उपस्थितीत झाली.
यामध्ये शेंद्रे भागातील भरतगाववाडी येथील ग्रामसेवक संजय यादव यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या स्वागत समारंभात पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, उपसभापती जाधव बापू, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांचे हस्ते नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. नागठाणे, शाहुपुरीसारख्या मोठ्या गावात काम केलेले व सध्या देगाव येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी मोहन कोळी यांची अध्यक्षपदी आणि संजय यादव यांची सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल माजी शिक्षण सभापती सुनील काटकर तसेच गावातील नागरिकांनी गौरव केला.