महंमदआजम पटेल यांना पोलिस महासंचालक पदक
By Admin | Updated: August 15, 2016 00:50 IST2016-08-15T00:50:46+5:302016-08-15T00:50:46+5:30
पटेल खंडाळा तालुक्यातील कण्हेरीचे

महंमदआजम पटेल यांना पोलिस महासंचालक पदक
शिरवळ : मुंबई पोलिस दलात कार्यरत असणारे व सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) याठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असणारे खंडाळा तालुक्यातील कण्हेरी गावचे सुपुत्र पोलिस निरीक्षक महंमदआजम युसूफ पटेल यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.
भारतामध्ये १४ जणांची पोलिस महासंचालक पदकाकरिता निवड झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांमधून महंमदआजम पटेल हे एकमेव पोलिस निरीक्षक या पदकाकरिता पात्र ठरले आहेत. पटेल यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाल्याचे वृत्त समजताच कण्हेरी येथे आनंद व्यक्त करण्यात आला. लवकरच एका कार्यक्रमात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पोलिस महासंचालक शरदकुमार यांच्या हस्ते पदकाचे वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)