शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

मोदी लाटेतही राजेंची कॉलर टाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:11 IST

सातारा : केंद्रात व राज्यात पाच वर्षांपूर्वी मोदी लाट आली होती. आता तर या लाटेचे त्सुनामीत रुपांतर झाल्याचे चित्र ...

सातारा : केंद्रात व राज्यात पाच वर्षांपूर्वी मोदी लाट आली होती. आता तर या लाटेचे त्सुनामीत रुपांतर झाल्याचे चित्र देशभर पाहायला मिळत आहे. या त्सुनामीत काँगे्रस-राष्ट्रवादीचे अनेक बुरूज ढासळले. या वादळाचा परिणाम मात्र सातारा लोकसभा मतदार संघात झाला नाही. शेजारच्या माढा, कोल्हापूर, सांगली, हातकणंगले मतदार संघात काँगे्रसचे बुरूज ढासळले गेले. मात्र, साताऱ्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उदयनराजेंनी शाबूत व सहीसलामत ठेवला. आपल्या अफाट लोकप्रियतेच्या बळावर उदयनराजेंनी भाजपची त्सुनामी बालेकिल्ल्यात शिरू दिली नाही. राष्ट्रवादीचे संस्थात्मक जाळे आणि आमदारांची ताकदही त्यांच्यासाठी पोषक ठरली.सातारा : उदयनराजे भोसले यांची कॉलर उडविण्याच्या स्टाईलवर सातारकर भलतेच फिदा आहेत. देशभर मोदींच्या लोकप्रियतेला चार चाँद लागले असले तरीही उदयनराजेंची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर देशभर काँगे्रस-राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरला. मात्र तो फॅक्टर साताºयात चालला नाही. उदयनराजेंचे मताधिक्य मागील निवडणुकीच्या तुलनेत घटले असले तरी त्यांचा पराभव करणे भाजप-शिवसेनेला शक्य झालेले नाही.२०१४ च्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी ३ लाख ६० हजार इतके मोठे मताधिक्य मिळवले होते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप या मित्रपक्षांनी राष्ट्रवादीचा पर्यायाने उदयनराजेंचा पराभव कुठल्याही परिस्थितीत करायचाच, या उद्देशाने सल्लामसलत करून सातारा लोकसभा मतदार संघात तुल्यबळ उमेदवार दिला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने शिवबंधन धागा बांधून लोकसभेची उमेदवारी दिली.डोक्यात गांधी टोपी आणि पीळदार मिशा अशा वेगळ्या पेहरावात सातारकरांसमोर आलेले नरेंद्र पाटील यांचे रांगडे व्यक्तिमत्त्व ग्रामीण भागातील लोकांना अपील होईल, अशी अपेक्षा भाजप-सेनेच्या नेत्यांना होती. काहीअंशी त्यात तथ्य होते. मात्र उदयनराजेंच्या अफाट लोकप्रियतेपुढे नरेंद्र पाटील यांचे हे रांगडे रूप पुरेसे ठरले नाही.संपूर्ण देशभर भाजप-शिवसेना या मित्र पक्षांनी जोरदार वावटळ उठवून दिली होती. ही वावटळ साताºयात निर्माण करण्यात भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांना अपयश आले. शिवसेनेने ऐनवेळी नरेंद्र पाटील यांना दिलेली उमेदवारी अनेकांना रुचली नाही. त्यामुळे पाटील यांच्यासोबत भाजप-शिवसेनेची एकसंध ताकद दिसली नाही. याउलट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा आदेश मानून राष्ट्रवादीचे नेतेमंडळी उदयनराजेंसाठी झाडून कामाला लागली होती.उदयनराजेंची झाली हॅट्ट्रिकलोकसभेत जाण्यासाठी २००९ मध्ये उदयनराजेंनी स्वत:च्या पक्ष नेत्यांशी संघर्ष केला होता. २0१४ मध्येही त्यांना विरोध झाला. तसाच तो २0१९ मध्येही झाला. मात्र, कसलेल्या पैलवानाप्रमाणे उदयनराजेंनी सर्व राजकीय कौशल्य पणाला लावून सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. उदयनराजेंची जादू आणि राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पक्षांचा जिल्ह्यात असलेला विश्वास यामुळे उदयनराजे पुन्हा जिंकले. मैं बोलता हूँ... ओ मैं करता हूँ... और मैं जो नहीं बोलता ओ मैं डेफिनेटली करता हूँ...!, असा रावडी डायलॉग नेहमीच उदयनराजेंच्या तोंडात असतो. कॉलर उडविण्याची त्यांची स्टाईल तर संपूर्ण देशात ‘फेमस’ आहे. तरुणवर्ग त्यांच्यावर फिदा आहे. तरुणांच्या मताचा वाढलेला टक्का उदयनराजेंसाठी फायद्याचा ठरला. उदयनराजेंनी तिसºयांदा करून दाखविले आहे. मोदी लाटेतही ते साताºयातून निवडून आले आहेत.