वाई शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:56+5:302021-01-08T06:07:56+5:30

वाई : शहरात गेल्या आठ दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. मोबाईल चोरट्यांचा वाई शहरात सुळसुळाट ...

Mobile thieves in Wai city .. | वाई शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट..

वाई शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट..

वाई : शहरात गेल्या आठ दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. मोबाईल चोरट्यांचा वाई शहरात सुळसुळाट झाला असून, भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतून मोबाईलविनाच परतावे लागत आहे तर काही महिलांचे पर्समधील मोबाईल घरी गेल्यावर समजते की मंडईतून मोबाईल गेले आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे.

वाई शहरात पोलिसांचा तसा चांगलाच खडा पहारा असतो; परंतु लॉकडाऊननंतर नव्याने मोबाईल चोरी करणारे चोरटे वाई शहरात सक्रिय झाले आहेत. वाई शहरात गर्दी होणारे ठिकाणाचा अभ्यास करून त्यांनी जिथे जिथे गर्दी होते तेथे तेथे मोबाईल चोरटे मोबाईलवर डाव साधत आहेत. भाजी मंडईत सीसीटीव्ही कॅमेरा असला तरीही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर चुकवून हे चोरटे वरच्या खिशातले मोबाईल गायब करत आहेत तसेच महिलांच्या पर्समध्ये मोबाईलही गायब होण्याचे प्रकार या आठवड्यात वाढले आहेत. वाई पोलिसांत तशा तक्रारी दाखल झालेल्या आहेत.

Web Title: Mobile thieves in Wai city ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.