वाई शहरात मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:40+5:302021-02-05T09:18:40+5:30
वाई : वाई शहरात प्रत्येक सोमवारी बाजाराच्या दिवशी सर्रास मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत. आज एकाच दिवशी आठ ...

वाई शहरात मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट
वाई : वाई शहरात प्रत्येक सोमवारी बाजाराच्या दिवशी सर्रास मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत. आज एकाच दिवशी आठ मोबाइल चोरी गेल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात, एसटी स्टँड, गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरटे सक्रिय झाले आहेत. मोबाइल चोरट्यांचा वाई शहरात सुळसुळाट झाला आहे.
भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतून मोबाइलविनाच परतावे लागत आहे, तर काही महिलांच्या पर्समधील मोबाइल घरी गेल्यावर समजते की मंडईतून मोबाइल गेले आहेत. मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट वाई शहरात वाढलेला आहे. मोबाइल चोरी करणारे चोरटे वाई शहरात सक्रिय झाले आहेत. वाई शहरात गर्दी होणाऱ्या ठिकाणाचा अभ्यास करून त्यांनी जेथे-जेथे गर्दी होते तेथे मोबाइल चोरटेबरोबर मोबाइलवर डाव साधत आहेत. भाजी मंडईत सीसीटीव्ही कॅमेरा असला तरीही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर चुकवून हे चोरटे वरच्या खिशातील मोबाइल गायब करत आहेत. तसेच महिलांच्या पर्समध्ये मोबाइलही गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. वाई पोलिसांत तशा तक्रारी दाखल झालेल्या आहेत. नागरिकांचे हजारो रुपयांचे महागडे आठ मोबाइल चोरीला गेले. त्याबरोबर त्यामधील डेटा, ऑनलाइन ॲपचे पासवर्ड असल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. तरी बाजाराच्या दिवशी भाजी मंडई, एसटी स्टँडवर साध्या वेशातील पोलीस तैनात करून चोरट्यांना जरब बसवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.