झेरॉक्स सेंटरमधून मोबाइल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:16+5:302021-02-06T05:15:16+5:30
सातारा : येथील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या सुमन झेरॉक्स सेंटरच्या काउण्टरवरून पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार ...

झेरॉक्स सेंटरमधून मोबाइल चोरी
सातारा : येथील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या सुमन झेरॉक्स सेंटरच्या काउण्टरवरून पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश लिंगन्ना कामठी (वय ३८, रा. जानकी निवास, सदरबझार, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी (दि. ४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुमन झेरॉक्स सेंटरमधील काउण्टरवर ठेवलेला पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल कोणीतरी अज्ञाताने चोरून नेला. याप्रकरणी महेश कामठी यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक यू.एन. जाधव करत आहेत.