मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:35 IST2021-01-18T04:35:53+5:302021-01-18T04:35:53+5:30
सातारा: येथील जिल्हा क्रीडा संकुलातील एका मोबाईल शॉपीत जाऊन महिला अकाऊंटंट तसेच इतर कामगारांना शिवीगाळ करुन दमदाटी करणाऱ्या एकास ...

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक
सातारा: येथील जिल्हा क्रीडा संकुलातील एका मोबाईल शॉपीत जाऊन महिला अकाऊंटंट तसेच इतर कामगारांना शिवीगाळ करुन दमदाटी करणाऱ्या एकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. ही घटना १६ जानेवारी रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भूविकास बँक चौकात असणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलात मयूर प्रदीप भणगे (वय २५, रा. राजसपुरा पेठ, सातारा) यांची एस. एस. मोबाईल शॉपी आहे. शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास दत्ता उत्तम घाडगे (वय २५, रा. दौलतगर, करंजे, सातारा) हा तेथे गेला. त्याने मोबाईल शॉपीमध्ये असणारी महिला अकाऊंटंट आणि इतर कामगारांना शिवीगाळ करत दमदाटी केली. यानंतर मयूर भणगे यांनी घाडगेच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.