शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले

By प्रमोद सुकरे | Updated: May 13, 2025 17:06 IST

कऱ्हाड : गेल्या काही दिवसापासून प्रतिक्षा असलेल्या सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ. अतुल सुरेश भोसले ...

कऱ्हाड : गेल्या काही दिवसापासून प्रतिक्षा असलेल्या सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ. अतुल सुरेश भोसले यांची मंगळवारी निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी ही निवड जाहीर केली. त्यांच्या या निवडीने भाजपला तरुण जिल्हाध्यक्ष लाभला आहे.भाजपच्या वतीने गत काही महिन्यांपासून संघटन पर्व २ राबवण्यात येत आहे. त्यामध्ये बूथ अध्यक्ष, तालुकाध्यक्ष निवडण्यात आले होते.मंगळवारी सातारा  जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. अतुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे.अतुल भोसले यांच्या निवडीमुळे जिल्ह्याला एक तरुण जिल्हाध्यक्ष मिळाल्याच्या भावना कार्यकर्त्यांच्यात आहेत.आमदार डॉ. अतुल भोसले यांनी यापूर्वी भाजप प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांनी चांगले काम करून दाखवले होते. त्यांनी पंढरपूरच्या  विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मोठ्या मताधिक्याने कराड दक्षिण मधून विजय संपादन केला आहे.या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जाते.

खरंतर जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये मी कोठेही नव्हतो. मात्र पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. - डॉ.अतुल भोसले, आमदार जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBJPभाजपाAtul Bhosaleअतुल भोसले