आमदार दाम्पत्य सायकलवर !
By Admin | Updated: March 8, 2016 00:50 IST2016-03-07T22:02:01+5:302016-03-08T00:50:11+5:30
मॉर्निंग राईड : सातारा-मेढा-सातारा पन्नास किलोमीटर प्रवास

आमदार दाम्पत्य सायकलवर !
सातारा : बंगल्यासमोर कोट्यवधी किमतीची गाडी उभी असतानाही सायकलवरून पन्नासहून अधिक किलोमीटरचा प्रवास करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व वेदांतिकाराजे भोसले यांना पाहून सातारकरांना अभिमान वाटला. शहरात अमर सायकल एजन्सीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘संडे मॉर्निंग राईड’ या उपक्रमात शिवेंद्रसिंहराजे यांनी सपत्निक सहभागी होऊन पर्यावरण विषयक जागृती केली.
आरोग्य आणि पर्यावरण विषयक जागृती हा उद्देश समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या ‘संडे मॉर्निंग राईड’ हा अभिनव उपक्रमात डॉक्टर, व्यावसायिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणींनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमास आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, विक्रमसिंहराजे भोसले यांनी सलग दुसऱ्या रविवारी सहभागी होऊन सायकलस्वारांचा उत्साह वाढविला. सातारा-मेढा-सातारा असा सुमारे ५० हून अधिक किलोमीटर सायकलवर प्रवास करून शिवेंद्रसिंहराजे व वेदांतिकाराजे भोसले यांनी पर्यावरण विषयक जागृती केली.
सातारकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)