शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या बगलबच्च्यांकडून जनतेची दिशाभूल - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 17:53 IST

‘शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, असे पंतप्रधान मोदी म्हणत असताना त्यांचे हे बगलबच्चे शरद पवारांवर टीका करत मस्तवालपणे सत्तेचा

दहिवडी (सातारा) : ‘शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, असे पंतप्रधान मोदी म्हणत असताना त्यांचे हे बगलबच्चे शरद पवारांवर टीका करत मस्तवालपणे सत्तेचा गैरवापर करून जनतेची दिशाभूल करत आहेत. या विरोधातच हल्लाबोल मोर्चा काढला जात आहे,’ असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

दहिवडी, ता. माण येथे राष्ट्रवादी पक्षाचा हल्लाबोल मोर्चा आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार विजयसिंह मोहिते, आमदार शशिकांत शिंदे, दिलीप चव्हाण, दत्तामामा भरणे, संग्राम कोते, संजीवराजे नाईक-निंबाळकर, तेजस शिंदे, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, चित्राताई वाघ, सभापती रमेश पाटोळे, जिल्हा परिषद सदस्या भारती पोळ, सोनाली पोळ, सुरेखाताई पखाले, कविता म्हेत्रे, संदीप पोळ, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. 

 अजित पवार म्हणाले, ‘२०१७ च्या विधानपरिषदेसाठी प्रभाकर घार्गे निवडणूक लढवायला नको म्हणाले, मग शरद पवारांनी शेखर गोरेंना उमेदवारी दिली. या सरकारने शेतकºयांची चेष्टा लावली असून, फक्त जाहिरातबाजी मार्केटिंगवर हे सरकार काम करताना दिसून येत आहे.’

 माण-खटाव तालुक्यात समज-गैरसमज न करता एकसंघ राहून सर्वांनी बरोबर यावे. जो चांगले काम करेल, त्याचाच विचार केला जाणार असून, शरद पवार हेच या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेतील. येणाºया निवडणुकीत पाटण, कºहाड, माण-खटावसह सर्व तालुक्यांतील आमदार व दोन खासदार निवडून आणावेत, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

 धनंजय मुंडे म्हणाले, ‘सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरत हल्लाबोल करत आहे. एक-एक टप्पा पुढे जातोय, तसतशी राष्ट्रवादीची धसकी या सरकारला बसताना दिसून येत आहे. भाजपच्या मनात राष्ट्रवादीची दहशत निर्माण झाली आहे.’

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘शेतकºयांच्या हिताचा केंद्रशासनाकडून निर्णय घेतला जात नाही. सरसकट कर्जमाफी होईपर्यंत राष्ट्रवादी आवाज उठवणार असून, कर्जमाफीसाठी तुम्हाला रांगेत उभे राहायला लावणाºया सरकारला आॅफलाईन करण्याची वेळ आली आहे.’ यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे यांनी मनोगते व्यक्त केली. सुनील माने यांनी प्रास्ताविक केले.  अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप पोळ यांनी आभार मानले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस