गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:10+5:302021-02-05T09:15:10+5:30
माजगाव गावठाण येथे एका पोल्ट्री फार्मनजीक अवैध वाळूसाठा करून तो जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये भरत असताना उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे ...

गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांना दणका
माजगाव गावठाण येथे एका पोल्ट्री फार्मनजीक अवैध वाळूसाठा करून तो जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये भरत असताना उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी वैभव सोनवणे व डेरवणचे तलाठी एस. एस. दुधगांवकर यांनी छापा टाकून जप्त केला. यावेळी जेसीबीसह ट्रॅक्टरही ताब्यात घेण्यात आला. माजगांवजवळील नाणेगांव गावठाणशेजारी एका पोल्ट्री फार्मजवळ गणेश थोरात (रा. कोर्टी) यांच्या मालकीच्या जेसीबीद्वारे वाळूचे उत्खनन करून दादासाहेब जाधव यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात होती. याबाबतची माहिती मिळताच महसूल विभागाने छापा टाकून कारवाई केली.
चाफळ विभागात एकाच आठवड्यात झालेली ही तिसरी कारवाई असून सडा कळकी येथे जांबा दगडाचे अवैध उत्खनन व वाहतूक तसेच चाफळ येथे मुरुमाचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याने एक जेसीबी, तीन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर चाफळ मंडलातच पुन्हा कारवाई झाल्याने गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.