जनावरे शेतात गेल्याने अल्पवयीन मुलीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:30+5:302021-09-07T04:47:30+5:30
सातारा : जनावरे राखत असताना जनावरे शेतात गेल्याने तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एकाने काठीने मारहाण केल्याची घटना कोकरे वस्ती, ...

जनावरे शेतात गेल्याने अल्पवयीन मुलीला मारहाण
सातारा : जनावरे राखत असताना जनावरे शेतात गेल्याने तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एकाने काठीने मारहाण केल्याची घटना कोकरे वस्ती, ता. माण येथे ४ रोजी घडली. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
भीमराव किसन कोकरे (रा. कोळेवाडी, ता. माण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोकरे वस्तीमधील एक तेरा वर्षांची अल्पवयीन मुलगी जनावरे चारण्यासाठी गेली होती. त्या वेळी भीमराव कोकरे याच्या शेतात जनावरे गेली. त्यामुळे कोकरे याने संबंधित मुलीच्या मनगटावर काठीने मारहाण करून तिला जखमी केले. हा प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर आई भीमराव कोकरेला जाब विचारण्यास गेली. त्या वेळी कोकरेने मुलीच्या आईला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.