शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजोगची पुनरावृत्ती; फलटणमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:36 IST

पाच संशयित फरार

सातारा/लोणंद (जि.सातारा) : फलटण तालुक्यात मस्साजोगची पुनरावृत्ती घडली आहे. दुचाकीवरून मित्रासमवेत निघालेल्या प्रतीक प्रमोद रणवरे या अल्पवयीन मुलाचे काळज-तडवळे फाटा येथे पाच जणांनी अपहरण केले. त्यानंतर अमानुष मारहाण करून खुटे गावाजवळ सोडून त्याला दिले.यानंतर पोलिसांनी रात्री अकरा वाजता त्याची सुटका केली. प्रतीकच्या पाठीवर मारहाणीचे वळ उठले असून, मुकामार लागल्याने त्यास बारामती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.प्रतीक रणवरे हा लोणंद येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. आयटीआय सुटल्यानंतर तो दररोज याच मार्गावरून मित्रासमवेत दुचाकीवरून घरी जात असे. हीच दिनचर्या लक्षात घेऊन अपहरणकर्त्यांनी पाळत ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता, प्रतीक आणि त्याचा मित्र नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जिंतीकडे निघाले होते. लोणंदपासून १०-१५ किलोमीटर अंतरावरील काळज-तडवळे फाटा परिसरात आले असता, गतिरोधकाजवळ त्यांच्या दुचाकीचा वेग मंदावला. त्याचा फायदा घेत दोन मोटारसायकलींवर आलेल्या पाच जणांनी गाडी आडवी मारून त्यांना अडविले. पाचही जणांनी तोंडाला स्कार्फ बांधलेले होते. त्यांनी जबरदस्तीने प्रतीकला गाडीवरून खाली उतरवले व त्याच्या मित्राला तिथेच सोडून दिले. प्रतीकला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून अपहरण करून ते पसार झाले. खुटे गावच्या हद्दीत त्याला अपहरणकर्त्यांनी सोडून दिले. यानंतर रात्री ११ वाजता पोलिसांनी प्रतीकची सुटका केली. यावेळी त्याच्या पाठीवर मारहाणीचे वळ होते.

पूर्वीच्या भांडणाची परिणीतीजिंती गावात एका सार्वजनिक कार्यक्रमात अपहृत प्रतीक आणि आरोपींमध्ये काहीसा वाद झाला होता. त्याच वादातून सूड घेण्याच्या उद्देशाने हे अपहरण केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.