सातारा : म्हसवड येथे एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची वरात काढण्यात आल्याच्या कथित प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल न झाल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात अल्पवयीन मुलाच्या पालकाने दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पुराव्यासह तक्रार अर्ज पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्मरणपत्रही देण्यात आले. तक्रारीत अल्पवयीन मुलावर बनावट आरोप लावून त्याची बाजारपेठेतून वरात काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या घटनेबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही आणि लेखी तक्रार देऊनही संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाच्या सन्मानाशी व त्याच्या हक्कांशी संबंधित हा विषय अत्यंत संवेदनशील असून तत्काळ गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलाचे पालक व नागरिकांनी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणाचा चाैकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले असल्याचे संबंधित मुलाच्या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
Web Summary : Satara citizens threaten protest over inaction in minor's procession case. Despite complaints against police, no FIR has been filed, prompting demands for immediate action and a fair investigation by Superintendent Tushar Doshi.
Web Summary : सतारा में नाबालिग की बारात पर नागरिकों का विरोध; पुलिस निष्क्रियता पर गुस्सा। पुलिस के खिलाफ शिकायत के बावजूद प्राथमिकी दर्ज नहीं, जिससे अधीक्षक तुषार दोशी से तत्काल कार्रवाई की मांग की गई।