शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मंत्री जयकुमार गोरे यांचे माण-खटावमध्ये ‘ऑपरेशन लोटस’; राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:57 IST

शरद पवार गटालाही खिंडार...

सातारा : माण-खटाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘ऑपरेशन लोटस’ची तीव्रता वाढवली आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांच्यासह राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे यांनी दिली.माण-खटावच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री झाल्यापासून अनेकांचा भाजप पक्षप्रवेश सुरू आहे. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधातील हेविवेट पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेण्याचे ऑपरेशन सुरू आहे. राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे अनेक दिवसांपासून मंत्री गोरे यांच्या संपर्कात होते. आता त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.मोरे यांच्यासह माजी उपसभापती बाळासाहेब माने-हिवरवाडीकर, माजी उपसभापती हिराचंद पवार, शंकरराव मोरे (दातेवाडी), मुरली भुशारी, बबन कदम, सुरेश पाटील, जयवंत घाडगे, राकेश चवर, अतुल यलमर, महेंद्र देशमुख, बापूराव घाडगे आणि इतर पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे अरुण गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शरद पवार गटालाही खिंडार...माण तालुक्यातीलही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत हे कमळ हाती घेत आहेत. त्यांच्याबरोबर सूरज गुंडगे, नगरसेवक महेश जाधव, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र रामचंद्र साळुंखे, दत्तात्रय अवघडे, वर्षाराणी सावंत, सोसायटी अध्यक्षा वैशाली सावंत, संचालक संजय जाधव, दत्तात्रय जाधव, प्रकाश जाधव, दीपक म्हेत्रे, राजेंद्र जाधव, प्रसाद जाधव, लालासाहेब अवघडे, साईनाथ जाधव, लक्ष्मण खताळ, राजेंद्र महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती गोरे यांनी दिली.

भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने ग्रामविकास विभागाचे महत्त्वाचे मंत्रिपद माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिले आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामे करण्याला प्राधान्य देत आहोत. या विकास प्रवाहात विरोधातील अनेकजणांची सहभागी होण्याची इच्छा आहे. आणखी विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. - जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Minister Gore's 'Operation Lotus'; NCP Leaders to Join BJP

Web Summary : Ahead of local elections, Minister Jaykumar Gore intensifies 'Operation Lotus' in Man-Khatav. NCP's Nandkumar More, Balasaheb Sawant, along with other officials, are set to join BJP in Mumbai. Many from both NCP factions are joining BJP as Gore focuses on bringing in heavyweight opposition leaders.