किमान अन् कमाल तापमान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:04+5:302021-03-24T04:37:04+5:30

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच कमाल तापमान ३५ ...

Minimum and maximum temperatures increased | किमान अन् कमाल तापमान वाढले

किमान अन् कमाल तापमान वाढले

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच कमाल तापमान ३५ अंशांवर असल्याने जिल्हा लवकरच तापणार आहे.

जिल्ह्यात हिवाळी ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होते. एक वेळ फक्त तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर तापमान हे सतत १४ ते १५ अशांवर राहिले. त्यामुळे यंदा थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ झाली. कमाल तापमान तर सतत ३५ अंशांवर होते. आता मार्च महिना संपत आला असून किमान तापमान २० अशांवर जाऊ लागले आहे, तर कमाल तापमानही ३५ अंशांवर आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे. सातारा शहरात तर कमाल तापमान सतत ३५ अंशांवर आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर ऊन वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहे.

चौकट :

साताऱ्याचे किमान आणि कमाल तापमान असे...

दि. १५ मार्च १८.०२ ३५.०७

दि. १६ मार्च १८.०८ ३६.०१

दि. १७ मार्च १९ ३६.०४

दि. १८ मार्च १९.०५ ३६.०४

दि. १९ मार्च २१.०४ ३५.०५

दि. २० मार्च १९.०१ ३५.०१

दि. २१ मार्च १८.०९ ३४.०५

दि. २२ मार्च १९.०१ ३५.०८

दि. २३ मार्च २१.०५ ........

.........................................................................

Web Title: Minimum and maximum temperatures increased