जिल्ह्यात ‘एमआयएम’
By Admin | Updated: August 22, 2015 00:53 IST2015-08-22T00:53:20+5:302015-08-22T00:53:20+5:30
इनामदार : पश्चिम महाराष्ट्रातील निवडणूक रिंगणात उतरणार

जिल्ह्यात ‘एमआयएम’
कऱ्हाड : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लीम समाजाचा उपयोग केवळ व्होटबँक म्हणून केला आहे. त्यामुळे आगामी काळात ‘आॅल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलीमीन’ म्हणजेच ‘एमआयएम’ पक्ष दलित तसेच मुस्लिमांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे,’ अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी दिली.
कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘एमआयएम’च्या जिल्हाध्यक्षपदी कऱ्हाडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफशिकलगार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी शाकिर तांबोळी, शब्बीर पीरजादे आदी उपस्थित होते.
‘एमआयएम’विषयी माहिती देताना इनामदार म्हणाले, ‘पश्चिमङ्कमहाराष्ट्रात ‘एमआयएम’ पक्षबांधणीसाठी मोठी मोहीम हाती घेणार आहे. पुढील वर्षी
होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका आमचा पक्ष सर्व ताकदीनिशी लढणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच मुस्लीम समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे हे दोन पक्षच आमचा मुख्य शत्रू असतील.
त्यांनी आतापर्यंत मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांना निवडणुकीची तिकिटे दिली. मात्र निवडून आणण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. परिणामी मुस्लीम
समाज सर्वच क्षेत्रात मागासलेला राहिला आहे. औरंगाबादमध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले आमचे नगरसेवक अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. तसेच काम राज्यात इतर ठिकाणीही करून दाखवणार आहोत.’
अल्ताफ शिकलगार म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुस्लिमांना केवळ आश्वासनेच दिली आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात त्यांच्यासह जातीयवादी पक्षांसाठी ‘एमआयएम’ हाच उत्तम पर्याय ठरणार आहे. (प्रतिनिधी)