पांगरखेलच्या विकासासाठी लाखोंचा निधी
By Admin | Updated: April 27, 2015 00:12 IST2015-04-26T22:42:11+5:302015-04-27T00:12:47+5:30
प्रभावती चव्हाण : सरपंच, ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

पांगरखेलच्या विकासासाठी लाखोंचा निधी
पुसेगाव : पांगरखेल येथील प्रमुख रस्ता, अंतर्गत रस्ता डांबरीकरण, ग्रामपंचायत कार्यालय, विठ्ठल-रुक्मिणी सभागृह व सिमेंट बंधारे व्हावेत, यासाठी सरपंच सुदर्शना जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या विकासकामांसाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात कामे मार्गी लावली आहेत,’ असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण यांनी केले. पांगरखेल, ता. खटाव येथे आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पै. सागर साळुंखे, कैलास घाडगे, प्रल्हाद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कदम, सरपंच सुदर्शना जगताप, उपसरपंच बाळकृष्ण जगताप, विनोद जगताप, गौरी जगताप, माजी सरपंच दिलीप जगताप, ज्ञानेश्वर जगताप, महेंद्र जगताप, शिवाजी जगताप, अजित जगताप, प्रसाद थोरवे, अधिक जगताप, वामन जगताप, हणमंत जगताप, सुरेश जगताप, तुकाराम जगताप, कैलास जगताप, चंद्रशेखर जगताप, लक्ष्मण जगताप, नितीन जगताप, अमित जगताप, किरण जगताप, रामदास जगताप यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
सभापती चव्हाण म्हणाल्या, ‘आ. शशिकांत शिंदे या विभागाचे लोकप्रतिनिधी होण्याअगोदर येथील मूलभूत प्रश्नांसह अनेक विकासकामे प्रलंबित होती. मात्र, आ. शिंदे या विभागाचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासकामाच्या पर्वाला सुरुवात झाली. विकासकामे करत असताना त्यांनी कधीही राजकीय गटातटाचा अथवा तेथील मतदानाचा विचार न करता केवळ विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावांमध्ये कोट्यवधींची विकासकामे साधली आहेत.
प्रल्हाद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच सुदर्शना जगताप व उपसरपंच बाळकृष्ण जगताप यांचा सभापती चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)