कोरेगाव तालुक्याला चक्रीवादळाचा सौम्य फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST2021-05-18T04:41:30+5:302021-05-18T04:41:30+5:30
कोरेगाव : अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा कोरेगाव तालुक्याला सौम्य फटका बसला. गेली दोन दिवस वादळी वारे व मुसळधार ...

कोरेगाव तालुक्याला चक्रीवादळाचा सौम्य फटका
कोरेगाव : अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा कोरेगाव तालुक्याला सौम्य फटका बसला. गेली दोन दिवस वादळी वारे व मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे.
मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात विजेचे खांब व तारा पडल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा परिणाम कोरेगावसह तालुक्यातील विविध गावांतील पाणी पुरवठा योजनांवर झाला आहे. अनेक गावांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. वीज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकणार नसला तरी युद्व पातळीवर महावितरण कंपनीचे काम सुरु आहे, लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने यांनी दिली.
सोमवार दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी वारे कमी प्रमाणात वाहत होते.