छत्रपती शिवाजी कॉलेजवर जवानांसाठी संदेशचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:01+5:302021-02-05T09:18:01+5:30
सातारा : रोट्रॅक्ट क्लब ऑफ सातारा, अजिंक्य आरआयडी ३१३२ व छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी ...

छत्रपती शिवाजी कॉलेजवर जवानांसाठी संदेशचा उपक्रम
सातारा : रोट्रॅक्ट क्लब ऑफ सातारा, अजिंक्य आरआयडी ३१३२ व छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी सीमेवरील जवानांसाठी संदेश लिहिण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
रोट्रॅक्ट क्लब ऑफ सातारा, अजिंक्य आरआयडी ३१३२ यांच्या विद्यमाने हा ‘संदेश ५.०’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या अंतर्गत सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना भारतीय सैन्यदलातील जवानांसाठी त्यांच्या देशभक्ती, त्याग व शौर्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संदेश लिहिण्याचे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव यांच्यामार्फत करण्यात आले होते.
यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, उपप्राचार्य डॉ. आनिसा मुजावर व शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच रोट्रॅक्ट इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे माजी जिल्हा प्रतिनिधी संतोष शिंदे व रोट्रॅक्ट क्लब ऑफ सातारा अजिंक्यचे अध्यक्ष धनराज निंबाळकर, सचिव ऋतुजा खिवांसरा, ज्ञानेश लोखंडे, शुभम चव्हाण, पीयूष कारंडे, अविनाश मेळावणे, मयुरेश शिंदे, विक्रम नलावडे, योगेश चव्हाण यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते. प्राचार्य विठ्ठल शिवणकर व उपप्राचार्य अनिसा मुजावर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
३०रोट्रॅक्ट
फोटो : उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर,शेजारी डाॅ. अनिसा मुजावर व रोट्रॅक्ट क्लब ऑफ सातारा अजिंक्यचे मेंबर्स उपस्थित होते.