जिल्ह्याचा पारा पुन्हा वाढू लागला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:41 IST2021-04-20T04:41:15+5:302021-04-20T04:41:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात वळवाच्या पावसानंतर पुन्हा पारा वाढू लागला आहे. सातारा शहरात सोमवारी ३७.०५ अंश कमाल ...

जिल्ह्याचा पारा पुन्हा वाढू लागला...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात वळवाच्या पावसानंतर पुन्हा पारा वाढू लागला आहे. सातारा शहरात सोमवारी ३७.०५ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर दुष्काळी तालुक्यात यापेक्षा अधिक पारा आहे. यामुळे उकाड्याने जीवाची घालमेल होत आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. मात्र, एप्रिल महिन्यात कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली. कमाल तापमान ३९ अंशापर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर जिल्ह्यात सलग पाच दिवस वळीव पाऊस पडला. त्यामुळे कमाल तापमान ३५ अंशाखाली आले. परिणामी ऊन कमी झाले. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, आता पुन्हा ऊन वाढू लागले आहे.
गेल्या पाच दिवसांत पारा वाढत चालला आहे. जिल्ह्यातील कमाल तापमान ३७ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांत उन्हाची तीव्रता अधिक आहे. यामुळे उकाड्याने जीव कासावीस होत आहे.
चौकट :
सातारा शहरातील कमाल तापमान असे :
१३ एप्रिल ३६.०२, १४ एप्रिल ३५, १५ एप्रिल ३४.०७, १६ एप्रिल ३६.०४, १७ एप्रिल ३७.०६, १८ एप्रिल ३७.०६ आणि १९ एप्रिल ३७.०५.