स्मृतिस्थळ परिसराचा विकास व्हावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:37+5:302021-02-05T09:15:37+5:30
कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापूरहून पुण्याकडे जाताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला भेट दिली. त्यांनी स्मृतिस्थळास ...

स्मृतिस्थळ परिसराचा विकास व्हावा!
कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापूरहून पुण्याकडे जाताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला भेट दिली. त्यांनी स्मृतिस्थळास अभिवादन केले. यावेळी पालिकेचे विरोधी गटनेते सौरभ पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे पदाधिकारी संजय पिसाळ, नंदकुमार बटाणे उपस्थित होते.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातील कृष्णा-कोयना प्रीतिसंगमावर सायंकाळच्या वेळेचे वर्णन वाचल्यानंतर याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे कऱ्हाडमध्ये आल्या होत्या. प्रारंभी सौरभ पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर खासदार सुळे स्मृतिस्थळी पोहोचल्या. स्मृतिस्थळ परिसराची पाहणी करीत त्यांनी सौरभ पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांच्या पलीकडील तिरांची माहिती घेत या भागाचे सुशोभिकरण होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी दर्शन घेतल्यानंतर प्रीतिसंगम बागेत असलेल्या अबालवृद्धांशी त्यांनी संवाद साधला. महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करताना या सर्वांना दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्याप्रती असणारा आदर पाहून खासदार सुप्रिया सुळे यांनी समाधान व्यक्त केले.