सभासदांनी ऊसदराचा खरा इतिहास जाणून घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:12+5:302021-06-20T04:26:12+5:30
कऱ्हाड : ‘माझ्या काळात एक बिल चुकवूनसुद्धा शेजारच्या कारखान्यांपेक्षा जादा दर दिला. मी पाच वर्षांत चोवीस बिले दिली. सभासदांनी ...

सभासदांनी ऊसदराचा खरा इतिहास जाणून घ्यावा
कऱ्हाड : ‘माझ्या काळात एक बिल चुकवूनसुद्धा शेजारच्या कारखान्यांपेक्षा जादा दर दिला. मी पाच वर्षांत चोवीस बिले दिली. सभासदांनी ऊसदराचा खरा इतिहास जाणून घ्यावा. अविनाश मोहिते व सुरेश भोसले यांनी नऊ ते दहा बिले चुकवली व इतर कारखान्यांपेक्षा दरही कमी दिला. हाही इतिहास आपण तपासला पाहिजे. सुरेश भोसले व अविनाश मोहितेंना ऊस बिलाशी अजिबात सोयरसूतक नाही. अविनाश मोहिते यांना स्वतःची लोकप्रियता टिकवण्यासाठी सत्ता पाहिजे तर सुरेश भोसले यांना मुलाला आमदार करण्यासाठी सत्ता पाहिजे. ऊसदर देण्यापेक्षा दोघांनाही स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा वाटतो. अशास्थितीत ते सभासदांचे काय कल्याण करणार?,’ असा प्रश्न यशवंतराव मोहिते रयत पॅनलचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते यांनी विचारला.
पोतले (ता. कऱ्हाड) येथे वडगाव हवेली-दुशेरे गटामधील उमेदवार डॉ. सुधीर जगताप, सुभाष पाटील, बापूसाहेब मोरे यांच्या प्रचारार्थ सभासदांच्या बैठकांमध्ये ते बोलत होते.
डाॅ. मोहिते म्हणाले, ‘सत्ता, पैसा आणि सहानुभूतीपोटी आपण आपल्या विकासाचा विचार विसरत आहोत. कारखाना हे आपले जीवन आहे. ही जाणीव ठेवून आपल्या कल्याणासाठी झटणाऱ्या रयत पॅनलच्या पाठीशी राहावे. ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. कारखानदारीचा प्रत्येकाच्या चुलीशी संबंध आहे. सभासदांचा संसार सुखरूप ठेवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रयत पॅनल झटणार आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरणार आहे. ऊसाला उच्चांकी दर, वेळेत ऊसतोड, बैठी पाणीपट्टी रद्द करणार, मयत सभासदांचे शेअर्स ट्रान्स्फर करणार यासह सभासदांना सावकार करण्याची मूळ भूमिका आम्ही राबविणार आहोत.’
फोटो ओळ
पोतले (ता. कऱ्हाड) येथील प्रचार दौऱ्यात डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सभासदांच्या भेटी घेऊन संवाद साधला.