नवती महोत्सवात मैत्रिणींची भेट
By Admin | Updated: December 9, 2014 00:31 IST2014-12-08T23:55:17+5:302014-12-09T00:31:48+5:30
पुण्यात मेळावा : वाई कन्याशाळेच्या माजी विद्यार्थिनी एकत्र

नवती महोत्सवात मैत्रिणींची भेट
सातारा : वाई कन्या शाळेच्या नवती महोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थिनींच्या मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या पुणे येथील इचलकरंजी सभाागृहात करण्यात आले होते. प्रसिध्द उद्योजिका आशाताई कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महर्षी आण्णांच्या शिल्पाकृतीस अभिवादन करून मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे सचिव रवींद्र देशपांडे, कार्याध्यक्षा स्नेहलता सहस्त्रबुध्दे, उपकार्याध्यक्ष विश्वास देवल, उपसचिव मुकुंद जोशी, पोपटलाल ओसवाल, मुख्याध्यापिका छाया नायकवडी व नवती महोत्सवाच्या कार्याध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
रवींद्र देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुण्या आशाताई कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, ‘महर्षी कर्वे यांनी आपले सारे आयुष्य स्त्री शिक्षणासाठी अर्पित केले आणि म्हणूनच आज स्त्रिया विविध क्षेत्रांत चमकत आहेत.’
शालेय समितीचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल यांनी वाई कन्या शाळेची प्रगती आणि विकास कामांची माहिती दिली. नवतीच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या खास शैलीत प्रभावीपणे विषद केले.
मेळाव्याच्या अध्यक्षा स्नेहलता सहस्त्रबुध्दे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी १९५५ साली ‘आॅलराऊंड विद्यार्थिनी’ म्हणून महर्षी अण्णांच्या हस्ते ज्यांचा सत्कार झाला होता त्या शालिनी अंजळ यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया नायकवडी यांनी केले. आजन्म सेविका स्वाती शेंडे यांनी नवती महोत्सवाविषयी माहिती सांगितली. पर्यवेक्षिका अनुजा सणस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनीषा देशपांडे यांनी आभार मानले. कविता जगताप यांनी सूत्रसंचालन केले. नीतादेवी गोंजारी, अश्विन भूतकर, वर्षा जोशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
मेळाव्यास डॉ. जयश्री जगताप, अरुण देव, कविता खटावकर, रतन शिंदे, नीला ढवण, जयश्री ओसवाल, विश्वास पवार, मनोज खटावकर यांची विशेष उपस्थिती होती. (प्रतिनिधी)