कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:41+5:302021-03-25T04:37:41+5:30

या बैठकीस नियोजन, वित्त, महसूल, वन, जलसंपदा, ग्रामविकास आदी विभागांचे मंत्री व प्रशासकीय अधिकारी तसेच श्रमिक मुक्ती दलाचे भारत ...

Meeting at the Ministry today on the question of Koyna dam victims | कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक

कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक

या बैठकीस नियोजन, वित्त, महसूल, वन, जलसंपदा, ग्रामविकास आदी विभागांचे मंत्री व प्रशासकीय अधिकारी तसेच श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर उपस्थित राहणार आहेत. कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. याचे सर्व श्रेय श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली लढणा-या प्रकल्पग्रस्तांचे आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारला आणि त्याला यश मिळत गेले. त्याचाच भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, बच्चू कडू, प्राजक्त तनपुरे, अदिती तटकरे, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे चैतन्य दळवी, महेश शेलार, मालोजी पाटणकर, सचिन कदम यांनी दिली.

Web Title: Meeting at the Ministry today on the question of Koyna dam victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.