शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात वैद्यकीय कचरा चक्क उघड्यावर टाकला, कठोर कारवाईची पर्यावरणप्रेमींची मागणी

By सचिन काकडे | Updated: January 23, 2024 18:41 IST

सातारा : रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यास बंदी असताना साताऱ्यातील यवतेश्वर घाटात अज्ञातांकडून हा कचरा चक्क रस्त्याकडेला टाकण्यात आला ...

सातारा : रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यास बंदी असताना साताऱ्यातील यवतेश्वर घाटात अज्ञातांकडून हा कचरा चक्क रस्त्याकडेला टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामध्ये औषधी, इंजेक्शन व अन्य वस्तू असून, असे कृत्य करणाऱ्यांवर पालिका प्रशासन व प्रदूषण मंडळाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.सातारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतून दररोज मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा बाहेर पडतो. पालिकेने नेमलेल्या एका खासगी संस्थेकडून हा कचरा संकलित करून त्याची सोनगाव कचरा डेपोतील प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम जबाबदारीने सुरू आहे. तरीदेखील काही अज्ञात व्यक्तींकडून रुग्णालयांमधील कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात डोंगरावरून आलेल्या जलवाहिनीच्या कोपऱ्यावर मोठ्या प्रमाणात असा कचरा टाकण्यात आला आहे. या कचऱ्यात औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकिटे, इंजेक्शन तसेच अन्य वस्तूंचा समावेश आहे.या परिसरात अनेक जनावरे व भटके श्वान खाद्याच्या शोधार्थ भटकंती करीत असतात. कळत-नकळत या जनावरांकडून वैद्यकीय कचरादेखील धुंडाळला जाऊ शकतो. या कचऱ्यामुळे मुक्या जनावरांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMedicalवैद्यकीयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न