साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय होणारच!

By Admin | Updated: July 27, 2014 23:02 IST2014-07-27T22:53:30+5:302014-07-27T23:02:29+5:30

पृृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही : तांत्रिक बाबी पूर्ण झाले की भूमीपूजन

Medical College to be held in Satara! | साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय होणारच!

साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय होणारच!

कऱ्हाड : ‘सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिली आहे. मात्र, जागेचा प्रश्न निर्माण होऊन ते काम गती घेऊ शकले नव्हते. आता मात्र जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की त्याचे भूमीपूजनही लवकरच होईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते़ यावेळी वनमंत्री डॉ़ पतंंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते़ धनगर समाजाच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, ‘त्यांच्या आरक्षणाबाबत मी सकारात्मकच आहे; पण त्यावर कायम स्वरूपाचा मार्ग निघावा म्हणून त्यांच्या शिष्टमंडळाकडे अवधी मागितला आहे़’ जागा वाटपावरून सुरू असणाऱ्या तणातणीबाबत छेडले असता, ‘अशा चर्चा तर होणारच; पण निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेत असतात़ जागावाटपाचा समझोता सन्मानपूर्वक झाला पाहिजे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नारायण राणेंची नाराजी उघड झाली आहेच़ त्यांनी मंत्रिपदाबरोबर प्रदेशाध्यक्षपद मागितलंय, असे विचारताच ‘हा निर्णय माझ्या हातात नाही,’ एवढेच उत्तर त्यांनी दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Medical College to be held in Satara!