मायणी रविवारचा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:51+5:302021-04-04T04:40:51+5:30

मायणी : मायणी व परिसरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने रविवार, दि. ४ रोजी होणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ...

Mayani Sunday market closed | मायणी रविवारचा बाजार बंद

मायणी रविवारचा बाजार बंद

मायणी : मायणी व परिसरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने रविवार, दि. ४ रोजी होणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला आहे.

खटाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मायणी गावाचा आठवडा बाजार प्रत्येक रविवारी भरतो. या आठवडी बाजारात पंचक्रोशीतील शेकडो विक्रेते व ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीसाठी येत असतात. परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून मायणीकडे पाहिले जाते.

मात्र, खटाव तालुक्यासह मायणी परिसरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने गेल्या मंगळवारी कलेढोण येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे मायणी आठवडी बाजार भरणार का? याकडे सर्व व्यापारी, शेतकरी व ग्राहकांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर मायणी ग्रामपंचायतीने येथील बसस्थानक परिसरामध्ये रविवार, दि. ४ पासूनचे आठवडी बाजार बंद राहणार असल्याचा सूचनाफलक लावल्याने अखेर आठवडी वादात बंद राहणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मायणी (ता. खटाव) येथे रविवार, दि. ४ एप्रिलपासूनचे आठवडी बाजार बंद असल्याबाबत ग्रामपंचायतीकडून फलक लावण्यात आला आहे. (छाया :संदीप कुंभार)

Web Title: Mayani Sunday market closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.