‘मातोश्री’तील आजी-आजोबांना लेकराकडून स्नेहभोजन

By Admin | Updated: August 9, 2015 23:42 IST2015-08-09T23:42:42+5:302015-08-09T23:42:42+5:30

चेहऱ्यावर तरळले समाधान

'Matoshree' grandmother's love for lover | ‘मातोश्री’तील आजी-आजोबांना लेकराकडून स्नेहभोजन

‘मातोश्री’तील आजी-आजोबांना लेकराकडून स्नेहभोजन

सातारा : महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजी-आजोबांनी आज लेकरानं दिलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या वृध्दाश्रमात ‘आजी-आजोबा’ दिवस साजरा करताना सुर्व्हेज प्युअर नॉनव्हेज या हॉटेलचे मालक माधव सुर्वे यांनी महिन्यातून एकदा जेवण देण्याचा शब्द दिला होता. त्याचा आज (रविवार) प्रारंभ झाला.साताऱ्यातील युवकांनी ‘आजी-आजोबा दिन’ केक कापून साजरा केला होता. कौटुंबिक कलहामुळे वृद्धाश्रमात विसावलेल्या आजी, आजोबांनी यानिमित्तानं नातवंडांचं प्रेम अनुभवलं होतं. हक्काच्या माणसांनी दुर्लक्षित केलेल्या आणि आपल्या आयुष्याची सायंकाळ वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या आजी-आजोबांचं एकाकीपण दूर व्हावं, त्यांना मायेची सावली मिळावी, या आपलेपणानं माधव सुर्वे यांनी महिन्यातून एकदा आजी-आजोबांना खास मेजवानी देण्याची भावना व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी दुपारी साडेबारा वाजता वृद्धाश्रमात सुग्रास भोजन देण्यात आले. बऱ्याच दिवसांनी आपलं असं कोणी भेटल्यानंतर जो आनंद होतो, तसंच समाधान आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. या उपक्रमावेळी हॉटेलचे कॅप्टन शुभम राजेघाडगे, महेश निकम, मातोश्रीचे व्यवस्थापक एस. एम. सागरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

चेहऱ्यावर तरळले समाधान
वृद्धाश्रमातील जेवणाच्या हॉलमध्ये सर्वांना एकत्र बसवून त्यांना स्नेहभोजन देण्यात आले. माधव सुर्वे आणि त्यांचे कर्मचारी हे स्वत: आग्रह करून आजी-आजोबांना जेवण वाढत होते. आपल्या घरात, आपल्या माणसांबरोबर बसून जेवण करत असल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Web Title: 'Matoshree' grandmother's love for lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.