शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मटकाकिंग समीर कच्छीसह ४२ साथीदारांना मोक्का, महाराष्ट्रातील पहिली मोठी कारवाई 

By दत्ता यादव | Updated: March 7, 2023 15:49 IST

गुन्ह्यांची यादी हैराण करणारी...

सातारा : जिल्ह्यात गल्लो-गल्ली मटक्याचे जाळे तयार करणाऱ्या मटकाकिंग समीर कच्छीसह (रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) त्याच्या ४२ साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. विषेश म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येची एकाच वेळी मोक्का कारवाई झालेली महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे. मटकाकिंग समीर उर्फ शमीम सलीम शेख उर्फ कच्छी याने त्याच्या साथीदारांनी ‘कच्छी गॅंग’ नावाची टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मटका, जुगाराचे जाळे तयार केले होते. त्यातून मिळणारा काळा पैसा गरजू लोकांना देऊन त्यांच्याकडून व्याजापोटी जास्त रक्कम जबरदस्तीने वसूल केली जात होती. एवढेच नव्हे तर व्याजाचे पैसे न दिल्यास टोळीच्या माध्यमातून पैशासाठी अपहरण करून, मारहाण करून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात होते. एका तक्रारदाराने पुढे होऊन मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या टोळीविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. 

आतापर्यंत मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या साथीदारांवर दोनशेहून अधिक जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्याकडे पाठविला होता. मात्र, फुलारे हे गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्याच्या दाैऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी साताऱ्यातच या प्रस्तावावर स्वाक्षरी करून मोक्का कारवाईवर शिक्कामोर्तब केले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलिस अधीक्षकांचे वाचक व सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, दीपक इंगवले, राजू कांबळे, महेश शिंदे, केतन शिंदे यांनी या कारवाईसाठी मोलाची कामगिरी बजावली.गोव्यापर्यंत कनेक्शन...मटकाकिंग समीर कच्छी याच्या गॅंगचे गोव्यापर्यंत कनेक्शन असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गोव्यातील मडगाव येथे सातारा पोलिसांनी छापा टाकून तब्बल ४२ जणांना अटक करून साताऱ्यात आणले. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता.

गुन्ह्यांची यादी हैराण करणारी...मटकाकिंग समीर कच्छीच्या गुन्ह्यांची यादी हैराण करणारी आहे. दोनशेहून अधिक जुगाराचे गुन्हे, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खुनासाठी अपहरण, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, गर्दी मारामारी, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 

आतापर्यंत ९० जणांना मोक्का...नोव्हेबर २०२२ पासून आतापर्यंत पाच मोक्का प्रस्तावांमध्ये तब्बल ९० जणांना मोक्का लावण्यात आला आहे. तसेच ११ जणांवर हद्दपारी आणि १ व्यक्तीवर झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस