शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: नायगाव येथे धरणात बुडून मावस आजोबा-नातवाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 11:05 IST

मृत पुणे येथील : यात्रेसाठी नातेवाइकांकडे आले अन् जीवाला मुकले

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील नायगाव लघु व पाटबंधारे विभागाच्या धरण क्रं. २ मध्ये पोहायला गेलेल्या मावस आजोबा-नातवाचा बुडून मृत्यू झाला. प्रशांत शाम थिटे (वय ४६, रा. लक्ष्मीनगर, पार्वती, पुणे), रुद्र प्रशांत चव्हाण (वय ७, रा. जांभूळवाडी, कात्रज, पुणे जि. पुणे सध्या रा. कामथडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या मावस आजोबा-नातवांचे नाव आहे.खंडाळा तालुक्यातील नायगावची ग्रामदैवताची वार्षिक यात्रा असल्याने नातेवाइकांकडे रुद्र प्रशांत चव्हाण आणि प्रशांत शाम थिटे हे आले होते. मावस आजोबा प्रशांत थिटे हे घरातील रुद्र चव्हाण याच्यासह चार लहानग्यांना घेऊन दुचाकीवरून पोहण्यासाठी धरणावर गेले असता त्या ठिकाणी रुद्र हा धरणाच्या पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने रुद्र बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी प्रशांत थिटे यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तेही पाण्यामध्ये बुडाले. त्या ठिकाणी पोहण्याकरिता सोबत आलेल्या तीन लहान मुलांनी आरडाओरडा केला. मात्र, कडक उन्हाचा तडाखा असल्याने जवळपास कोणीच नव्हते. संबंधितांनी घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतर पळत येत घडलेली घटना नायगाव येथे असलेल्या घरातील नातेवाइकांना सांगितली.यादरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक नयना कामथे यांची टीम तसेच शिरवळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी, कन्हेरी येथील गणेश पवार याने धाडस दाखवीत बुडालेल्या प्रशांत थिटे व रुद्र चव्हाण यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यांना शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेचा पोलिस अंमलदार राजेंद्र फरांदे, अजित बोऱ्हाटे हे अधिक तपास करीत आहेत.

तब्बल साडेपाच तास तणावाची स्थितीनायगाव, ता. खंडाळा येथील धरणामध्ये लहानग्यासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली असता नातेवाइकांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात गर्दी केली. यावेळी मृत लहानगा रुद्र चव्हाण याच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी केलेल्या आक्रोशामुळे मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिरवळ पोलिसांनी व नातेवाइकांनी संबंधितांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. यावेळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू