अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची जुळवाजुळव!

By Admin | Updated: May 21, 2015 00:11 IST2015-05-19T23:06:01+5:302015-05-21T00:11:39+5:30

‘कृष्णा’चे धुमशान : २१ मे पासून खरी रणधुमाळी, इच्छुक उत्सुक

Match the wishes to fill the application! | अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची जुळवाजुळव!

अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची जुळवाजुळव!

कऱ्हाड : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते ‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला आहे. गुरुवार, दि. २१ पासून अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी सुरू होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी जुळवाजुळव दिसत आहे. कागदपत्रांची तपासणी अगोदरच वकिलांकडून करण्यात येत आहे.‘कृष्णे’च्या इतिहासात यंदा प्रथमच तिरंगी सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापकपॅनेल विरोधात माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते यांचे रयत पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांचे सहकार पॅनेल रिंगणात उतरणार असल्याचे मानले जाते.
यापूर्वीच्या अनेक निवडणुकींत मोहिते-भोसले कुटुंबातील संघर्षच ‘कृष्णे’ च्या निवडणुकीत पाहायला मिळाला; पण गत निवडणुकीत या मोहिते-भोसले कुटुंबीयांचे मनोमिलन झाले. कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना मात्र ते मनोमिलन पटल्याचे निवडणूक निकालात दिसले नाही. त्यामुळे अविनाश मोहिते यांच्या रूपाने कृष्णेत खऱ्या अर्थाने सत्तांतर झाले, अशी चर्चा झाली. परंतु पाच वर्षांनंतर आज कृष्णाच्या निवडणुकीला सामोरे जाताना कौटुंबिक मनोमिलनाला तडा गेल्याचेच दिसत आहे. त्यामुळे तिरंगी लढत निश्चित मानली जाते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २१ ते २५ मे अशी पाच दिवसांची असली तरी यात रविवारची सुटी येत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी फक्त चार दिवसच मिळत असल्याने त्याची पूर्वतयारी सध्या सुरू असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)

अर्ज भरून ठेवा, मग बघू...
तिन्ही पॅनेलमधून सध्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे समोरच्या पॅनेलचा उमेदवार ठरल्यानंतर आपले नाव निश्चित करू, अशी भूमिका नेत्यांनी घेतली आहे. परिणामी, अनेकांना अर्ज तरी भरून ठेवा; मग बघू, अशा तोंडी सूचना दिल्याने इच्छुकांची गडबड सुरू आहे.

Web Title: Match the wishes to fill the application!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.