मस्करवाडीला अजूनही प्रतीक्षा सुनीलची !

By Admin | Updated: February 7, 2016 00:53 IST2016-02-07T00:53:58+5:302016-02-07T00:53:58+5:30

सियाचीनमधील हिमस्खलन

Mascarenhas still waiting for Sunil! | मस्करवाडीला अजूनही प्रतीक्षा सुनीलची !

मस्करवाडीला अजूनही प्रतीक्षा सुनीलची !

म्हसवड : ‘देवा माझं बाळ सुखरूप परत येऊ दे,’ असा धावा बेपत्ता जवान सुनील सूर्यवंशी यांची माउली करीत आहे. सियाचीनमधील हिमस्खलनानंतर बर्फाखाली दबलेले सुनील सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांसह मस्करवाडीचे ग्रामस्थ देवाकडे प्रार्थना करीत आहेत. सुनील नक्कीच सुखरूप असावा व तो परत यावा, यासाठी ते आस लावून बसले आहेत.
माण तालुक्यातील कुक्कुडवाड हद्दीत डोंगर पायथ्याला असलेल्या वस्तीत विठ्ठल पंढरी सूर्यवंशी हे कुटुंबीयांसह राहत आहेत. त्यांचा मोठा मुलगा तानाजी हा कऱ्हाड येथे बँकेत नोकरीला आहे. दुसरा मुलगा सुनील (वय २९) लष्करात आहे. सुनील हे २०१० मध्ये सैन्यात दाखल झाले. सुनील यांची पत्नी रेखा, एक वर्षाची मुलगी व आई असा परिवार मस्करवाडीत राहत आहे.
 

Web Title: Mascarenhas still waiting for Sunil!