महाबळेश्वरवाडीच्या उपसरपंचपदी मारुती मदने यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST2021-09-03T04:40:58+5:302021-09-03T04:40:58+5:30

वरकुटे-मलवडी : महाबळेश्वरवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मारुती खंडू मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा मुरलीधर जगताप ...

Maruti Madane elected as Deputy Panch of Mahabaleshwarwadi | महाबळेश्वरवाडीच्या उपसरपंचपदी मारुती मदने यांची निवड

महाबळेश्वरवाडीच्या उपसरपंचपदी मारुती मदने यांची निवड

वरकुटे-मलवडी : महाबळेश्वरवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मारुती खंडू मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सुनंदा मुरलीधर जगताप यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच अंकुश गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या इमारतीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा चंद्रकांत वगरे, विजय जोतिराम गाढवे, सुवर्णा दत्तात्रय घाडगे, सुनंदा मधुकर जेडगे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक उमेश कोळी व ग्रामविस्तार अधिकारी आय. ए. शेख यांनी काम पाहिले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. यावेळी बाळासाहेब कोठावळे, दिगांबर जगताप, बाबा होनमाने, सुरेश घाडगे, आप्पा सूर्यवंशी, नाथा गाढवे, मधुकर जेडगे, विजय पुकळे, उत्तम जगताप, दीपक जगताप, गोरख वगरे, ज्ञानदेव कोठावळे, रमेश जगताप,राहुल कोठावळे, शशिकांत कोठावळे, धर्मराज कोठावळेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपसरपंच पदाची संधी मिळाल्याने माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, वरकुटे-मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप, राष्ट्रवादी युवकचे राज्य सरचिटणीस अभय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माने, माजी सरपंच रामचंद्र नरळे, विक्रम शिंगाडे, धीरज जगताप, बाळासाहेब आटपाडकर, संजय पुकळे, डॉ. आनंदराव खरात, जालिंदर खरात, संजय जगताप, सुनील थोरात, भागवत अनुसे, शिवाजी शिंगाडे, रघुनाथ जगताप या मान्यवरांनी काैतुक केले.

Web Title: Maruti Madane elected as Deputy Panch of Mahabaleshwarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.