शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचे सुपुत्र सुरज शेळके यांना लडाखमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 11:48 IST

अडीच महिन्यांपूर्वी ते गावी खटावला सुट्टीवर आले होते. मनमिळावू जवान सुरज यांचे अचानक निधन झाल्याने खटाव व परिसरावर शोककळा पसरली आहे.

खटाव : सीमेवर सेवा बजावताना लडाख येथे येथे महाराष्ट्रातील एका जवानाला वीरमरण आले. शहीद जवान सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आहे. जवान सूरज प्रताप शेळके (वय २३) असे शहीद जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनामुळे खटाव परिसरात शोककळा पसरली. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचे निधन झाल्याचे लष्कराकडून शेळके कुटुंबाला कळविण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून ते आजारी होते.जवान सुरज शेळके यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण खटाव येथे झाले होते. साडेतीन वर्षांपूर्वी ते लष्करात भरती झाले होते. सध्या ते आरटी रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावत होते. अडीच महिन्यांपूर्वी ते गावी खटावला सुट्टीवर आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. आजारातून बरे झाल्यावर ते कर्तव्यावर रुजू झाले होते.मात्र गुरुवारी सायंकाळी चार वाजता जवान सुरज यांना अचानक त्रास झाल्याने त्यांना वीरमरण आले. सध्या लेह लडाखमध्ये वातावरण खराब असल्याने जवान सुरज यांचे पार्थिव लष्करी तळावर आणण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सुरुवातीला दिल्ली नंतर पुणे येथे विमानाने त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. रविवारी सकाळी जवान सुरज यांचे पार्थिव खटाव येथे आणण्यात येणार आहे. मनमिळावू जवान सुरज यांचे अचानक निधन झाल्याने खटाव व परिसरावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndian Armyभारतीय जवानladakhलडाख