शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शिवथरच्या विवाहितेचा खून अनैतिक संबंधातून, पळून जाण्यास नकार दिल्याने चिडून गळा चिरला; प्रियकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:19 IST

मुलगा आईविना पोरका, सातारा तालुका पोलिसांची पुण्यात कारवाई

शिवथर : शिवथर (ता. सातारा) येथील गुजाबा वस्तीवरील पूजा प्रथमेश जाधव (वय ३०) या विवाहितेच्या खुनाचा छडा अवघ्या आठ तासांत लावण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले. तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, प्रियकराला पुण्यातून पोलिसांनी अटक केली.अक्षय रामचंद्र साबळे (वय २७, रा. शिवथर, ता. सातारा) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पूजा जाधव हिचा सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पती प्रथमेश हा साताऱ्यातील एका दुकानात काम करतो. सोमवारी, दि. ७ रोजी सकाळी पती नेहमीप्रमाणे कामावर गेला, तर सासू-सासरे शेतात आणि पाचवी इयत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. पूजा घरात एकटीच होती. दुपारी चारच्या सुमारास तिचे सासरे घरी आले. त्यावेळी हा खुनाचा प्रकार निदर्शनास आला. पूजाचा धारदार शस्त्राने गळा चिरल्याचे समोर आले होते.

सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी या घटनेनंतर तातडीने पोलिसांची विविध पथके तयार केली. यातील एका पथकाला पूजा हिचे अक्षय साबळे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, तो पुण्यात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांचे एक पथक तातडीने पुणे येथे गेले. स्वारगेट येथून अक्षय साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर त्याने पूजा जाधव हिच्या खुनाची कबुली दिली.गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे, अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजित गुरव, सोनू शिंदे, हवालदार दादा स्वामी, पंकज ढाणे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, रामचंद्र गोरे, आशिष कुमठेकर, सतीश बाबर, आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला.

पळून जाण्यास नकार दिल्याने खूनसहा वर्षांपासून दोघांचे अनैतिक संबंध होते. आपण पळून जाऊन लग्न करू, असा वारंवार तगादा लावला होता. परंतु, तिने नकार दिला. याच कारणावरून चिडून जाऊन हाताने गळा दाबला. त्यानंतर कटरने गळा चिरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हा गुन्हा केवळ आठ तासांत उघडकीस आणला.

मुलगा आईविना पोरकापूजा जाधव हिचा मुलगा आठ वर्षांचा आहे. आपली आई या जगात नाही, याची पुसटशीही कल्पना त्याला नाही. आई कुठे आहे, असे तो वडिलांना विचारतोय. हे पाहून घरातल्यांना अश्रू अनावर होत आहेत.