तीन वर्षांच्या मुलाला विष पाजून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST2021-09-16T04:49:56+5:302021-09-16T04:49:56+5:30

पाचवड : तीन वर्षांच्या मुलाला विषारी औषध पाजून विवाहितेने स्वत:ही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना भुइजमधील ...

Married woman commits suicide by poisoning three-year-old boy | तीन वर्षांच्या मुलाला विष पाजून विवाहितेची आत्महत्या

तीन वर्षांच्या मुलाला विष पाजून विवाहितेची आत्महत्या

पाचवड : तीन वर्षांच्या मुलाला विषारी औषध पाजून विवाहितेने स्वत:ही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना भुइजमधील वरचे चाहूर येथे मंगळवारी दुपारी घडली. मुलावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पूजा सुदाम भोरे (वय २४, रा. वरचे चाहूर भुइज, ता. वाई) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूजा भोरे हिने मंगळवार, दि. १४ रोजी दुपारी पावणेतीन वाजता मुलगा राजवीर (वय ३) याला विषारी औषध पाजले. त्यानंतर तिनेही स्वत: विषारी औषध प्राशन केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सध्या तिचा मुलगा राजवीर याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आले नसून भुइज पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Married woman commits suicide by poisoning three-year-old boy