सातारा बाजार समितीमधील जागांचा बाजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:54+5:302021-03-25T04:37:54+5:30
सातारा : शेतकऱ्यांच्या जनावरांच्या मोकळ्या जागेत सातारा बाजार समितीने बाजार केला आहे. या पटांगणातील एक इंच जागादेखील शिल्लक ठेवली ...

सातारा बाजार समितीमधील जागांचा बाजार!
सातारा : शेतकऱ्यांच्या जनावरांच्या मोकळ्या जागेत सातारा बाजार समितीने बाजार केला आहे. या पटांगणातील एक इंच जागादेखील शिल्लक ठेवली नाही. या जागांची व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप शेतकरी संघटना व किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी केला असून याविरोधात ३ एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
गोडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची जागा फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरात आणावी, असा उद्देश आहे. तथापि मोकळ्या जागा, कोपऱ्यावरच्या छोट्या छोट्या जागा, देखील अन्य व्यावसायिकांना बेकायदा दिल्या आहेत. या जागा देताना कोणत्याही परवानगी देण्यात आलेली नाही, जागांची विल्हेवाट लावण्यात आली असताना नगरपालिका, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. विशेषतः करंजे विकास सेवा सोसायटी करंजे यांच्या मालकीची एक जागा बाजार समितीमध्ये असताना देखील जागा ते कायदेशीर एका व्यावसायिकाला देण्यात आली आहे.
बाजार समितीच्या जागा बेमालूमपणे विल्हेवाट कवडीमोल किमतीने लावल्यानंतर आता ज्या ठिकाणी शेतकरी मंडईसाठी जागा शेतकरी संघटना आंदोलनानंतर उपलब्ध केली त्या जागेवर समितीचे पदाधिकारी सदस्यांनी मोर्चा वळवला आहे. या ठिकाणी गाळे बांधण्यात येत असून येत असून बांधकाम शेतकरी हिताचे नाही. याठिकाणी गाडीत झाल्यास शेतकरी शेतमालाची विक्री करणार कुठे असा प्रश्न उभा राहिलेला आहे.