विवाहितेचा जाचहाट; पतीसह नऊ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:26+5:302021-02-05T09:10:26+5:30
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह नऊ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किरण भाऊसाहेब शिंदे, ...

विवाहितेचा जाचहाट; पतीसह नऊ जणांवर गुन्हा
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह नऊ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
किरण भाऊसाहेब शिंदे, ताई भाऊसाहेब शिंदे. तेजस्विनी योगेश रणपिसे, योगेश रणपिसे (सर्व, रा. गोंदवले, ता. माण), स्वाती मानसिंग बनसोडे, मानसिंग बनसोडे (दोघे, रा. नरवणे, ता. माण), स्नेहल पवन जाधव (रा. कठापूर, ता. सातारा), धनश्री प्रशांत येवले (रा. कोरेगाव), प्राची अरविंद झेंडे (रा. गुरसाळे, ता. खटाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
स्मिता किरण शिंदे (वय ३७, सध्या रा. मालगाव, ता. सातारा. मूळ रा. गोंदवले बु., ता.माण) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांनी पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत 'तुला घरातील कामे व्यवस्थित करता येत नाहीत,' असे म्हणून वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच पती किरण याने स्मिता यांना दारूच्या नशेत लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली.