शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मराठवाडी धरण परिसर कोरोनाने हादरला, अकरा कामगार बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 5:53 PM

CoronaVirus In Satara : मराठवाडी धरणस्थळावर कोरोनाचा फैलाव झाला आहे. अकरा कामगार बाधित आढळल्याने धरण व्यवस्थापनासह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधितांपैकी अनेकजण परप्रांतीय असून कोरोना केअर सेंटर बरोबरच काहींवर कोरोना हॉस्पिटलमध्येही उपचार सुरू आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्याचा धरणाच्या बांधकामावरही थोडाफार परिणाम जाणवत आहे.

ठळक मुद्देमराठवाडी धरण परिसर कोरोनाने हादरला, अकरा कामगार बाधित संसर्ग वाढल्याने धरणाच्या बांधकामावर परिणाम होण्याची शक्यता

ढेबेवाडी : मराठवाडी धरणस्थळावर कोरोनाचा फैलाव झाला आहे. अकरा कामगार बाधित आढळल्याने धरण व्यवस्थापनासह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधितांपैकी अनेकजण परप्रांतीय असून कोरोना केअर सेंटर बरोबरच काहींवर कोरोना हॉस्पिटलमध्येही उपचार सुरू आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्याचा धरणाच्या बांधकामावरही थोडाफार परिणाम जाणवत आहे.मराठवाडी धरणाच्या बांधकामावर महाराष्ट्रासह विविध राज्यातील कामगार कार्यरत आहेत. धरणस्थळी पत्र्याच्या शेडवजा खोल्यांमध्ये ते राहतात. सहा दिवसांपूर्वी तीन कामगारांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील जाधव व त्यांचे सहकारी संदीप साळुंखे, सिद्धार्थ गवई, शंतुनू पाटील, मेघा मराठे, कांता बर्डे, स्वाती थोरात, डी. एस. करवते आदींनी धरणस्थळी जाऊन चाळीस कामगारांची चाचणी केली. त्यातील आठजण बाधित आढळले.काहींना तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. अकरा बधितांपैकी तिघांवर कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अँटीजन चाचणी निगेटिव्ह आलेल्या वीसजणांची आरटीपीसीआर टेस्टही घेण्यात आली असून त्याचा अहवाल रात्रीपर्यंत प्राप्त झालेला नव्हता. त्यामुळे रुग्णसंख्या आणखीन वाढण्याची भीती आहे.

अकराही रुग्णांच्या संपर्कातील लोकांची चार दिवसांनी पुन्हा चाचणी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. बाधीतांपैकी अनेक कामगार बांधकाम करणारे आहेत. कोरोनाच्या फैलावाचा थोडाफार परिणाम धरणाच्या बांधकामावरही दिसून येत आहे. जंतुनाशक फवारणीसह विविध उपाययोजना हाती घेतल्या असून सर्व कामगारांना आवश्यक दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. असे आरोग्य विभाग व धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आम्ही आरोग्य यंत्रणेच्या सतत संपर्कात आहोत. लवकरच मराठवाडी धरण परिसर कोरोना मुक्त होईल.- सुरेन हिरेकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर