कर्मवीरांच्या शाळा प्रवेश नोंदीचा मराठीत अनुवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:06+5:302021-02-05T09:11:06+5:30

दहीवडी : कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दहीवडी येथील एक नंबरच्या शाळेत तिसरीमध्ये १ फेब्रुवारी १८९९ रोजी शाळा प्रवेश झाला ...

Marathi translation of Karmaveer's school admission record in Marathi | कर्मवीरांच्या शाळा प्रवेश नोंदीचा मराठीत अनुवाद

कर्मवीरांच्या शाळा प्रवेश नोंदीचा मराठीत अनुवाद

दहीवडी : कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दहीवडी येथील एक नंबरच्या शाळेत तिसरीमध्ये १ फेब्रुवारी १८९९ रोजी शाळा प्रवेश झाला होता. सालाबादप्रमाणे याहीवर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शाळा प्रवेश दिन शाळेत साजरा करण्यात आला. यावर्षी कर्मवीरअण्णांच्या शाळेतील प्रवेशाचा लिखित नोंद असलेला मोडीलिपीमधील मजकूर मायणी येथील मोडीलिपी तज्ज्ञ संतोष देशमुख यांच्या माध्यमातून मराठीत अनुवादित करण्यात आला.

याच शाळा प्रवेश दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागाचे सहायक विभागीय अधिकारी सुरेशकुमार गोडसे, दहीवडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य बी. एस. खाडे, परशुराम शिंदे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंद्रजिता चव्हाण, केंद्रप्रमुख नारायण आवळे, रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती जाधव, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य पुरुषोत्तम जाधव, मुख्याध्यापक विजय चव्हाण, पुरातत्व वास्तुविशारद हर्षवर्धन गोडसे उपस्थित होते.

यावेळी विभागीय अधिकारी गोडसे यांनी, कर्मवीरांच्या आठवणींचा ठेवा जपण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर केले. प्राचार्य बलवंत यांनी, शाळेसाठी संस्थेकडून एक लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. वास्तुविशारद हर्षवर्धन गोडसे यांनी, मूळ इमारत जतन करण्याबाबत व सुशोभितबाबत आराखडा मांडला. सागर जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

०२दहिवडी-स्कूल

दहीवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य बी. एस. बळवंत, प्राचार्य बी. एस. खाडे, विजय चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Marathi translation of Karmaveer's school admission record in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.