शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी युवक आक्रमक, क-हाडमध्ये नदीपात्रात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 13:18 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चाच्या वतीने क-हाडात गेल्या दोन दिवसांपासून महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

क-हाड (सातारा) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चाच्या वतीने क-हाडात गेल्या दोन दिवसांपासून महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यातच शुक्रवारी (3ऑगस्ट) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मराठा आंदोलक कृष्णा नदीपात्रात उतरले. पाण्यात उतरून त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर सध्या मोर्चा, आंदोलने सुरू आहेत. क-हाडातही या आंदोलनाची धग पोहोचली असून, काही दिवसांपासून येथे मोर्चा, आंदोलने, रॅली काढून आरक्षणाची पुन्हा मागणी केली. या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मराठा महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मराठा युवक आंदोलक शहरानजीकच्या कृष्णा नदीपात्राकडे गेले. त्या ठिकाणी भगवे झेंडे उंचावून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

आक्रमक आंदोलन नदीपात्रात उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रुपाली चव्हाण यांच्यासह तहसीलदार राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी हिम्मत खराडे या ठिकाणी पोहोचले. त्यांना आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन करीत पाण्यातून बाहेर येण्याची विनंती केली. त्यानुसार अर्धा तासाने आंदोलक नदीपात्रातून बाहेर आले. यावेळी अनेकांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर