मराठा क्रांती मोर्चाची मंगळवारी दहिवडीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:25 IST2017-07-31T15:25:35+5:302017-07-31T15:25:35+5:30

दहिवडी : दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात माण तालुका मराठा समाज समन्वयकांची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत १ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता दहिवडी येथील सिध्दनाथ मंगल कार्यालयात तालुकास्तरीय भव्य बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

maraathaa-karaantai-maoracaacai-mangalavaarai-dahaivadaita-baaithaka | मराठा क्रांती मोर्चाची मंगळवारी दहिवडीत बैठक

मराठा क्रांती मोर्चाची मंगळवारी दहिवडीत बैठक

दहिवडी : दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात माण तालुका मराठा समाज समन्वयकांची प्राथमिक बैठक पार पडली.  या बैठकीत १ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता दहिवडी येथील सिध्दनाथ मंगल कार्यालयात तालुकास्तरीय भव्य बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 ९ आॅगस्टला मुंबईत होणाºया मराठा समाजाच्या महामोर्चाची प्रत्येक तालुक्यात जोरदार तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून माण तालुका मराठा समाजाची प्राथमिक बैठक दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.  या बैठकीस तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत महामोर्चाच्या नियोजनासंबंधी महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यातील मराठा समाजाची तालुकास्तरीय भव्य बैठक मंगळवार, दि. १ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता सिद्धनाथ मंगल कार्यालय, दहीवडी येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुंबई येथील मोर्चाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

Web Title: maraathaa-karaantai-maoracaacai-mangalavaarai-dahaivadaita-baaithaka