शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कास डोंगरमाथ्यावर निसर्गाने फुलविले आरोग्यपूर्ण दान, रानोरानी दुर्मीळ रानभाज्या 

By दीपक शिंदे | Updated: June 28, 2023 14:09 IST

रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

पेट्री : शहराच्या पश्चिमेस दुर्गम, डोंगराळ भागातील कास परिसरासह आसपासच्या डोंगररांगात निसर्गाने दिलेले सर्वात मोठे, आरोग्यदृष्ट्या उत्तम दान म्हणजे मान्सून सक्रिय होत असताना अनेक रानभाज्या उगवल्या आहेत. जुने, अनुभवी व्यक्ती रानोरानी दुर्मीळ रानभाज्या शोधून आणत आहेत. या रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.काही थंड तर काही उष्णवर्गीय रानभाज्या परिसरात उपलब्ध होत असतात. भारंगीची भाजी विशेष आवडीने खातात. याच्या पानात लोहाचे प्रमाण जास्त असते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कोवळी पाने शिजवून कुरडूची भाजी केली जाते. ही भाजी खोकला, कफ कमी करण्यासाठी गुणकारी असते. आळू, भारंगी, शेंडवल, आक्वल, भोकरी, तरळी, वाघचौवडा, अळंबी, मोरशेडा, कुरडू, रानआळू आदींसारख्या गोड, आंबट, खारट चव असणाऱ्या नैसर्गिकरीत्या उगवलेल्या पौष्टिक, औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत नसल्याने पावसाळा ऋतूत भाज्यांचे सेवन केल्याने शरीरास आरोग्यदृष्ट्या महत्वाच्या ठरतात.             पावसाळा सुरू झाला की साधारण जून महिन्यापासून या रानभाज्या निसर्गत: कास तसेच आसपासच्या डोंगराळ भागात उगवून येण्यास सुरुवात होते. रानभाज्या दसरा, दिवाळीपर्यंत उपलब्ध असतात. सध्या कास परिसरासह आसपासच्या सर्व डोंगराळ भागात या रानभाज्या मुबलक प्रमाणात उगवून येण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक ग्रामस्थ या भाज्यांचा समावेश आहारात करतात. शहरी भागात अशा रानभाज्या खायला मिळणे म्हणजे फारच दुर्मीळ. जवळच्या बाजारपेठेत देखील ग्रामस्थांकडून या रानभाज्या विक्रीस नेल्या जातात.कोणत्याही खताविना उगवून आलेल्या या रानभाज्या पावसाळ्यात पर्वणीच असते. चवदार, पौष्टिक, औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात. परंतु, एकसारख्या दिसणाऱ्या काही वनस्पती विषारीदेखील असू शकतात. म्हणून जुन्या, जाणकार, अनुभवी व्यक्तीच या रानभाज्या शोधून आणतात. या रानभाज्यांची भाजी कशा पद्धतीने करायची याची माहितीदेखील इतरांना देतात.

डोंगरातील निसर्गतः उगवलेल्या या रानभाज्या आरोग्यास फायदेशीर आहेत. डोंगरातील शेंडवल, भारंगीसारख्या अनेक रानभाज्या आम्ही आवडीने खातो. या रानभाज्या कसलेच कष्ट न करता आपोआप उगवतात. पावसाळ्यातील रानभाज्या निसर्गाचे एक प्रकारे वरदानच आहे.  - कृष्णा आखाडे, कुसुंबीमुरा, ता. जावळ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठार