ऐन दुष्काळातही अनेक गावं जलयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:56 IST2019-03-10T22:56:08+5:302019-03-10T22:56:13+5:30
स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव, भोसरे व खबालवाडी या तिन्ही गावांची जलयुक्त ...

ऐन दुष्काळातही अनेक गावं जलयुक्त
स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव, भोसरे व खबालवाडी या तिन्ही गावांची जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला. त्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी श्रमदान करून मातीनाल बांध, सिमेंट नाला बांध, शेततळी उभारली. या केलेल्या कामामुळे गावची पाणी साठवण क्षमता वाढली आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यात औंध परिसरात तर दरवर्षी पाण्याचे जास्त दुर्भिक्ष जाणवत असते. दरवर्षी डिसेंबर महिन्यांपासूनच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण हे चित्र पालटण्याचा निर्धार परिसरातील ग्रामस्थांनी केला. त्यात औंध परिसरातील जायगाव, भोसरे आणि खबालवाडी आदी गावांचा शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये ओढे-नाल्यांचे रुंदीकरण आणि सिमेंट बंधारे उभारण्यात आले. दरम्यान, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेस सुरुवात झाली. यातही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रमाणे सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या सुरुवातीपासून गावांमध्ये लोकवर्गणी आणि श्रमदान करून मोठ्या प्रमाणात ‘माथा ते पायथा’ अशा प्रकारे जलसंधारणीची कामे केली. दोन वर्षे केलेल्या कामानंतर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले. त्याचा गावांना चांगला परिमाण झाला. मार्च महिन्यातही या गावांमधील बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे.
ताळेबंदामुळे
टिकलं पाणी
औंध परिसरातील जायगाव, भोसरे व खबालवाडी गावे जलसंधारणाची कामे करून थांबली नाही. तर गावांनी उपलब्ध पाण्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी ताळेबंद आखला. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करत सूक्ष्म सिंचनाचा वापर केला. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न तर वाढलेच त्याचबरोबर गावाची पाणीटंचाई संपण्यास मदत झाली आहे.