मंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 04:02 PM2020-12-01T16:02:39+5:302020-12-01T16:08:40+5:30

Sharad Pawar, Satara area, Politics, udayanrajebhosle मंडल आयोगामुळे मराठा समाज इतर समाजापासून बाजूला फेकला गेला. या आयोगाच्या शिफारशींमुळे मराठा समाजावर अन्याय झाला. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सर्व समाज एकत्र ठेवण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांनीच मंडल आयोगाला पाठींबा देऊन टाकला. आता सर्वांनी एकत्र आल्याशिवाय समाजापुढील प्रश्न सुटणार नाहीत, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार यांनी केले.

Mandal Commission did injustice to Maratha community: Shashikant Pawar | मंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार

मंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार

googlenewsNext
ठळक मुद्देमंडल आयोगाने मराठा समाजावर अन्याय केला : शशिकांत पवार शरद पवारांनी विरोध करायचा सोडून पाठिंबा दिला

सातारा : मंडल आयोगामुळे मराठा समाज इतर समाजापासून बाजूला फेकला गेला. या आयोगाच्या शिफारशींमुळे मराठा समाजावर अन्याय झाला. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सर्व समाज एकत्र ठेवण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांनीच मंडल आयोगाला पाठींबा देऊन टाकला. आता सर्वांनी एकत्र आल्याशिवाय समाजापुढील प्रश्न सुटणार नाहीत, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार यांनी केले.

साताऱ्यातील जलमंदिर येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते.

पवार म्हणाले, ह्यगेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी हा मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत आहोत. ज्येष्ठ नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी क्षत्रिय मराठा समाजाची स्थापना केली. त्यांच्यासोबत मी देखील मराठाच नव्हे तर सर्व समाजांच्या हितासाठी लढत होतो.

अखिल भारतीय मराठा महासंघाने आर्थिक निकषावर आरक्षण दिले जावे, असा ठराव केला होता. मात्र मंडल आयोग या बाबीचा उल्लेख नव्हता. मराठा समाजाला बाजूला ठेवून मंडल आयोगाने शिफारशी लागू केल्या होत्या. या आयोगाला वसंतदादा पाटील यांनी विरोध केला. तर शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या बाजूने कौल दिला.ह्ण

पवार म्हणाले, मंडल आयोग हा मराठा समाजाला इतर समाजापासून दूर करणारा आहे, त्यामुळे शरद पवार यांनी यात लक्ष घालावे असे वारंवार सांगून देखील त्यांनी दुर्लक्ष केले. मंडल आयोगातील शिफारसी ह्या मराठा समाजावर कशा अन्यायकारक आहेत, याचे विवेचन मी एका पुस्तिकेत द्वारे केले आहे. पवारांनी केलेले दुर्लक्ष त्याला राजकीय कारण असू शकते. मात्र अन्यायग्रस्तग्रस्त मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेला आहे.

मोठा लढा देऊन संयुक्त महाराष्ट्र कशासाठी मिळवला, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राजकीय लोक घडीघडीला बदलतात आम्ही त्यातले नाही. जे काय आहे ते समाजाच्या हितासाठी मांडत होतो. आता तरी सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा महाराष्ट्र एकसंघ राहणार नाही.

अन्यथा तुमच्या हातून भले मोठे पाप होईल : उदयनराजे

महाराष्ट्रात जे आमदार आहेत त्यांचे मतदार मराठा समाजातील देखील आहेत हे त्यांनी विसरू नये. सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ मागणी केल्याशिवाय मराठा समाजाचे अन्याय दूर होणार नाहीत. आता फाटे फोडत बसू नका महाराष्ट्राचे तुकडे होण्यापासून वाचवायची असेल तर वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना बाजूला केले पाहिजे तसं झालं नाही तर मोठं पाप होईल. मराठा समाजाला आरक्षण हा राज्याचा प्रश्‍न आहे केंद्राकडे कशाला दाखवता, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

Web Title: Mandal Commission did injustice to Maratha community: Shashikant Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.